महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार रात्रंदिवस कोरोना काळात आपल्या जिवावर उदार होऊन काम करीत आहेत. पण या कामगारांना फेब्रुवारीपासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
महानगरपालिकेमध्ये तीन खासगी एजन्सीमार्फत जवळपास 1200 कज्ञामगार वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. सर्वाधिक कंत्राटी कामगार सध्या कोरोना सेंटर चेक पॉईंट क्वारंटाईन सेंटर येथे कार्यरत आहेत. पण या कामगारांचे फेब्रुवारीपासूनचे वेतन थकलेले आहे.
मनपा प्रशासनाने कंत्राटदाराला बील देऊनही कामगारांना वेतन दिले जात नाही की मनपा प्रशासनाने कंत्राटदाराला बील दिले नाही याबाबत कामगार अंधारात आहे. मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून कंत्राटी कामगारांचे थकीत पगार द्यावे, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे.












